बनावट आरोपी हजर करणारा फौजदार फरार

दौंड – दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक करणारा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे अंमलदार राकेश फाळके यांनी दिली.

रेल्वे प्रवासात एका रेल्वे तिकीट परीक्षकांना मारहाणप्रकरणी इंद्रजित यादव (रा. बालाजीनगर, लिंगाळी, दौंड) याच्याविरुद्ध दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्यात मंगळवार (दि. 13) दौंड लोहमार्ग न्यायालयात रेल्वे सुरक्षा दलाचे फौजदार संतोष श्रीरंग लोंढे (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी इंद्रजित यादव याच्याऐवजी बनावट तरुण आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर केला. न्यायाधीश जी. एस. वर्पे यांना शंका आल्याने त्यांनी आरोपीचे ओळखपत्र सादर करण्यास सांगितले असता तो करू न शकल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान शुक्रवार (दि. 16) लोहमार्ग न्यायालयाने रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक राठोड यांना फौजदार श्रीरंग लोंढे यास ताब्यात घेऊन दौंड पोलिसांसमोर हजर करण्याचे लेखी आदेश देण्यात संतोष लोंढे यास शुक्रवार (दि. 16) सोलापूर येथे ताब्यात घेण्यात आले. पोलीस बंदोबस्तात शनिवारी (दि. 17) त्यास दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात आणले असता मध्यरात्री संतोष लोंढे हा लघुशंकेसाठी जाण्याचे कारण सांगत पसार झाला. याबाबत (दि. 20) दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तीन दिवसांनी फिर्याद दाखल
दौंड शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यातून फौजदार संतोष लोंढे पसार झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या विलंबाने फिर्याद दाखल करण्यात आली असल्याने या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का?
दौंड रेल्वे स्टेशन येथील स्टेशन प्रबंध सॅम्युल क्‍लिफ्टन आणि सिंग हे अधिकारी न्यायाधीशांनी भेटण्यासाठी गेले असून, त्यांनी फौजदार लोंढे याच्याकडून चूक झाली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करू नका, अशी विनंती केली असल्याची नोंद फिर्यादित आहे, त्यामुळे आता अधिकाऱ्यांवर रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)