Shirur News : शिरूर बसस्थानकावर दिवसाढवळ्या चोरी; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शिरूर शहरातील (Shirur News) मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shirur News : शिरूर शहरातील (Shirur News) मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका अनोळखी महिला चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे, सुमारे ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अत्यंत चलाखीने लंपास केले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता अशोक राऊत (वय ५०, रा. साईस्वराज्यनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास शिरूर बसस्थानक परिसरात आल्या होत्या. बसस्थानकावरील गर्दीतून जात असताना, एका सराईत महिला चोरट्याने (Shirur News) गर्दीचा गैरफायदा घेतला. अनिता राऊत यांच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणावर डल्ला मारून ती महिला चोरटा गर्दीत पसार झाली.
गळ्यातील दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच राऊत यांनी तातडीने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
सराईत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय?
या धक्कादायक घटनेमुळे (Shirur News) बसस्थानक परिसरात सध्या सराईत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करून त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“बसस्थानक, बाजारपेठ आणि इतर गजबजलेल्या ठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन शिरूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.






