Pune news : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला मारहाण
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शेजाऱ्यांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार धानोरी परिसरात घडला आहे.

Pune news : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शेजाऱ्यांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार धानोरी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी गिनीबेलव्हिस्टा सोसायटीत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज पांडे (वय ४०), मोनिका पांडे (वय ४०) तसेच सूरज पांडे यांची आई, मामा आणि मामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मे रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे धानोरी परिसरातील गिनीबेलव्हिस्टा सोसायटी, डी. एन. परांडे पार्क येथे राहतात. फिर्यादी महिलेला सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून सूरज पांडे यांनी बाहेर काढले होते.
याचा जाब विचारण्यासाठी त्या आरोपींकडे गेल्या असता, त्यांना शिवीगाळ करत बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाखे करत आहेत.





