Pimpri Chinchwad Crime : भोसरीत मध्यरात्री पोलिसांची मोठी ‘रेड’! १६ किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडलं
Pimpri Chinchwad Crime : भोसरीच्या देवकर वस्तीत १६ किलो गांजाची साठवणूक; ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.
Updated On:

Pimpri Chinchwad Crime – मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून तो विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. १७ फेब्रुवारी) रात्री दीड वाजताच्या सुमारास गोविंद गार्डन जवळ, देवकर वस्ती, भोसरी येथे करण्यात आली. विशाल रावण मोहिते (वय २४, रा. यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव) आणि गणेश बाबुराव थोरात (वय २४, रा. यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव)
अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक आबासाहेब माने (वय २४) यांनी मंगळवारी (दि. १७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद गार्डन जवळ, देवकर वस्ती,
येथे मोकळ्या जागेत मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी विक्रीसाठी १६ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगला होता. पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





