Ashok Kharat Case : SIT च्या चौकशीत मोठा खुलासा ! भोंदू अशोक खरातचे ‘ते’ गुपित समोर
लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकाव प्रकरणात अटकेत असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पापकर्मांचा कच्चा चिट्ठा आता एसआयटी (SIT) च्या चौकशीत उघड होत चालला आहे.

Ashok Kharat Case : लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकाव प्रकरणात अटकेत असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पापकर्मांचा कच्चा चिट्ठा आता एसआयटी (SIT) च्या चौकशीत उघड होत चालला आहे.
मंगळवारी झालेल्या सुमारे पाच तासांच्या चौकशीत खरातच्या नियोजनबद्ध आणि हायप्रोफाइल कार्यशैलीचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
आध्यात्मिक गुरूचा बुरखा पांघरून भोळ्या-भाबड्या जनतेला लुटणारा हा भोंदू किती व्यवस्थित रीतीने आपले साम्राज्य चालवत होता, याचे चित्र तपास यंत्रणेला पाहून चक्रावून टाकणारे आहे.
खरातचे ‘चार मोबाईल’ जाळे उघड
एसआयटीच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करत होता. प्रत्येक क्रमांकाची वेगळी भूमिका होती आणि तो त्यानुसार वेगवेगळ्या गटांशी संपर्क साधत असे.
राजकीय नेत्यांसाठी खास नंबर :
हा क्रमांक केवळ बड्या राजकीय नेत्यांशी संवाद साधण्यासाठी वापरला जात असे. सत्तेच्या वर्तुळात आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी खरात हा नंबर वापरत होता.
महिला आणि श्रीमंत भक्तांसाठी दुसरा नंबर :
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीमंत भक्त आणि महिलांशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक ठेवण्यात आला होता. या नंबरवरून अनेक अनुचित प्रकार घडल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
आर्थिक व्यवहारांसाठी तिसरा नंबर :
पैशांच्या देवाणघेवाणी, आर्थिक व्यवहार आणि सावकारीसंबंधित कामांसाठी हा क्रमांक विशेषतः राखीव ठेवला होता.
सर्वसामान्य भक्तांसाठी चौथा नंबर :
सामान्य लोक आणि भक्तांशी संपर्क साधण्यासाठी हा सार्वजनिक क्रमांक होता. याच नंबरद्वारे तो आपली लोकप्रियता आणि ‘गुरू’ची प्रतिमा टिकवून ठेवत होता.
फॉरेन्सिक तपासात मोठे खुलासे अपेक्षित
खरातने यापूर्वी अनेकदा तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र आता फॉरेन्सिक टीमने हे चारही मोबाईल ताब्यात घेतले आहेत. डिलीट केलेले डेटा, चॅट्स, ऑडिओ क्लिप्स, मेसेज आणि कॉल रेकॉर्ड्स रिकव्हर करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
तपास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, या डेटामधून अनेक राजकीय नेते, बड्या हस्ती, उद्योगपती आणि महिलांशी संबंधित माहिती समोर येण्याची शक्यता आहे. धर्माच्या नावाखाली चालणारा हा गोरखधंदा आता पूर्णपणे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.






