Crime News: अनोळखी इसमासोबत इंस्टाग्रामवर करत होती चॅटिंग; आई रागावल्याने अल्पवयीन मुलगी गेली घर सोडून

शिरूर : शिरूर शहरातील बागवाननगर येथून (दि. २० जुलै) संध्याकाळी ७:३० वा सुमारास अल्पवयीन मुलगी अनोळखी इसमासोबत घर सोडून निघून गेली आहे. इन्स्टाग्रामवर चॅटींग करत असल्याचे तिच्या आईने पाहीले.
आई खुप रागावल्याने तिने राहत्या घराचा दरवाजा लावून पलायन केले असल्याचं सांगितलं आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, ‘मुलीची आई व त्यांची अल्पवयीन मुलगी हे दोघेच घरात असतात.
मुलगी ही एक अनोळखी मुलासोबत इंन्स्टाग्रामवर चॅटीग करत असल्याचे तिच्या आईने पाहीले. त्या मुलीला आई रागावल्याने ती घरातुन कोणास काही एक न सांगता रागाच्या भरात घराचे दरवाजाचा कडी कोंडा लावून घरातून निघून गेली आहे.
परंतु तिला कोणीतरी अज्ञान पणाचा फायदा घेऊन आईच्या कायदेशीर रखवालेतून फूस लावून पळून नेले आहे. मात्र, आता अज्ञात व्यक्तीविरुद्ध आईने तक्रार दिल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





