पुणे- बलात्काराचा बनाव करत एका ५९ वर्षाचे व्यक्तीला आडबाजूला नेत ५० लाखाची खंडणी मागण्यात आली. यासंदर्भात एका महिलेसह जुन्नर येथील पाच जणांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे युनियन बँक ऑफ इंडीया विमाननगर.
शाखा येथे असताना एका महिलेने फोन करुन त्यांची सर्व माहिती घेववुन प्रेमाचे नाटक केले. त्यांना नारायण गाव येथे बोलावून अज्ञातस्थळी घेवुन जावुन तेथे तिचे नातेवाईक यांना बोलावुन घेतले तेथे त्यांना फिरयादीने जबरदस्तीने शरीर संबंध केले.
असे खोटे सांगितल्या नंतर त्यातील एका ने फिरयादीच्या गळयाला कुऱ्हाड लावुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन प्रकरण मिटवणेसाठी ५० लाख रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती ३० लाख रु चे युनियन बँक चे दहा लाखाचे तिन चेक जबदरस्तीने लिहुन घेतले आहेत.