Crime News : अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार २४ तासाच्या आत गजाआड

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरूर पोलिसांनी गजाआड केला आहे. पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१ वर्ष) हे त्याचे नाव असून तो वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर येथील रहीवाशी आहे.
फेब्रुवारी २०२४ ते मार्च २०२४ या दरम्यान कवठे येमाई गावच्या हृद्दीत चंदननगर ते न्यु इंग्लिश स्कुल या दरम्यान वैभव शेळके याने एक अल्पवयीन मुलगी ही शाळेला जात असताना त्याने मोटार सायकल वरून तीचा पाठलाग करून तीच्याकडे एक टक पाहुन हसुन तीला डोळा मारून तीचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसल्यामुळे तपासात अडथळा येत होता. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व सहकाऱ्यांनी अथक तपास करत त्याला गजाआड केले आहे.





