Crime News : गरोदर मैत्रिणीला जिवे मारण्याचा प्रयत्न; पालघरमध्ये नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल…

पालघर – येथील एका व्यक्तीने मुल नको म्हणून गरोदर असलेल्या आपल्या 22 वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदीनुसार आरोपीविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस प्रवक्ते सचिन नावडकर यांनी पीटीआयला सांगितले आहे.
आरोपी आणि महिला, वाडा तालुक्यातील कोणे गावातील रहिवासी असून, त्यांच्यात मैत्री झाली आणि जून 2022 पासून त्यांच्यात संबंध होते. कालांतराने जेव्हा महिलेने शाररिक संबंधांची मागणी नाकारल्यानंतर तेव्हा त्याने तिच्या घरी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नंतर, जेव्हा महिलेने पुरुषाला ती गर्भवती असल्याची माहिती दिली तेव्हा त्याने तिला गर्भाचा करण्यास सांगितले. तिने त्यास नकार दिल्यानंतर, सोमवारी त्या व्यक्तीने महिलेला घराबाहेर बोलावले आणि तिला जबरदस्तीने विषारी पदार्थ पाजून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेला नंतर रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.





