Crime News : मिरजेतील तरुणावरील हल्लाप्रकरणी 6 जणांना अटक
मिरज शहरातील टाकळी रोडवर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर झालेल्या हल्लाप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल (Crime News) असून या सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Crime News : मिरज शहरातील टाकळी रोडवर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर झालेल्या हल्लाप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल (Crime News) असून या सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मतीन काझी, शौकत शेख, आयान लांडगे, शोएब शेख उर्फ निया व अन्य दोन अनोळखी अशा 6 जणांचा समावेश आहे.
गंभीर जखमी असलेल्या शिव उर्फ प्रदीप सदाशिव अथणीकर (वय २८, रा. टाकळी रोड, मिरज) हा मोटारसायकलवरून मिरजकडे (Crime News) जात असताना त्याचा पाठलाग करत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. त्याला तत्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला होता. मतीन काझी व त्याच्या पाच सहकाऱ्यांनी तलवार आणि कोयत्याच्या साहाय्याने अथणीकर याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण, मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रवाना करण्यात आले.
संशयितांना गुरुवारी पहाटेच्या दरम्यान महात्मा गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्वीच्या वादातून व वैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी मिरजेतील (Crime News) हॉटेल रस्सा येथे यांतील संशयित मतीन काझी याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शिव अथनीकर संशयित होता.
टाकळी रोडची घटना घडताना मतीन काझी व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘हॉटेल रस्सा आठवतोय का?’असा उल्लेख करूनच हल्ला केला असल्याचे मिरज शहर पोलीसात फिर्यादी प्रदीप पोपट खरे (रा. दुर्गानगर, मिरज) याने फिर्यादीत सांगितले होते. याबाबत पोलीस सध्या चौकशी करत आहेत. जखमी शिवप्रसादची प्रकृती स्थिर होताच त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरज शहर पोलीस सतर्क
शिव अथनीकर याच्यावर हल्ल्यानंतर मात्र शिव अथनीकर याच्या समर्थकांत मोठी हालचाल पाहायला मिळाली. दोन गटातील टोळी युद्धातून शिव अथनीकरवर हल्ला झाल्यानंतर मिरज शहर पोलिस सतर्क झाले होते.
याबाबत तरुणांच्या दोन गटांंत पुन्हा वाद उफाळून येणार या शक्यतेने पोलिसांनी गस्त वाढविली होती. बुधवारी रात्री 8 वाजता मिरजेतील ब्राम्हणपुरी परिसरात कोयता घेऊन तरूणांची सहा जणांची टोळी हल्लेखोरांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना मिळाली. नंतर ब्राम्हणपुरी याठिकाणी सापळा लावला.
यावेळी सहा जण मोटरसायकलवर कोयता घेऊन जात असताना पोलिसांनी पाठलाग करून यातील तीन जणांना पकडले. तर तिघे पळून गेले. पकडलेल्या तिघांकडून दोन कोयते आणि रॉड पोलिसांनी जप्त केला. या दोन्ही टोळीतील तरुणांना मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.






