Crime News : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३९ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरूर : शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९ वर्ष) रा. नागापूर, ता. जि. बीड या नराधम मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, दि. २७ डिसेंबर २०२४ पासून दि. २२ जानेवारी २०२५ रोजी पर्यंतच्या कालावधीमध्ये वेळोवेळी शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द, या ठिकाणी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या हॉलमध्ये मिस्त्री काम करण्यासाठी आलेल्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९ वर्ष ) रा. नागापूर, ता. जि. बीड याने अल्पवयीन १३ वर्षीय मुलीचे व त्याचे कपडे काढून जबरदस्तीन तिच्या ओठांना किस करून, तिच्या छातीवरून हात फिरवून तिच्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध निर्माण करून लैंगिक अत्याचार केला. सध्या या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करत आहे.





