Revanth Reddy : “गुन्हेगारीचे संरक्षण लोकशाहीत होत नाही…” – मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
जेव्हा हजारो कोटी रुपये आणि शेकडो एकर जमीन बेकायदेशीरपणे लुटली जाते, तेव्हा चौकशी आवश्यक आहे.

हैदराबाद – कथित फोन-टॅपिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या चौकशीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी म्हणाले की, प्रत्येकाने केलेल्या चुकांसाठी चौकशीला सामोरे गेलेच पाहिजे.
लोकशाही प्रक्रियेत, लोकांना आणि लोकप्रतिनिधींना लोकशाहीच्या मर्यादेत राहून आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु गुन्हा करण्याचे आणि आपल्यावर कोणतीही चौकशी होऊ नये अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य नाही.
तेलंगणा शहीद स्मारक ट्रस्टने स्थापित केलेला रवी नारायण रेड्डी राष्ट्रीय पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना प्रदान केला. त्यावेळी रेवंत रेड्डी बोलत होते.
रेवंत रेड्डी म्हणाले की, जेव्हा हजारो कोटी रुपये आणि शेकडो एकर जमीन बेकायदेशीरपणे लुटली जाते, तेव्हा चौकशी आवश्यक आहे. शिबू सोरेन, जे. जयललिता आणि येडियुरप्पा यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांना चौकशीला सामोरे जावे लागले नाही का? आम्ही देव नाही. लोकशाहीत, प्रत्येकाने केलेल्या चुकांसाठी चौकशीला सामोरे गेले पाहिजे.
रेड्डी म्हणाले की, काही व्यक्ती स्वतःला तेलंगणाचे जनक आणि तेलंगणा कार्यकर्ते म्हणून सादर करण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण त्याला काहीही अर्थ नाही. दुसरीकडे, पोलिसांनी केसीआर यांना नोटीस बजावली, पण ते म्हणत आहेत की केसीआर यांना नोटीस म्हणजे संपूर्ण तेलंगणा समाजाला नोटीस.
तेलंगणा कार्यकर्त्यांचा अपमान का केला जात आहे, असा प्रश्नही ते विचारत आहेत. कोदंडाराम कार्यकर्ते नाहीत का? तेलंगणा आंदोलनादरम्यान दंडाराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले. परंतु मागील सरकारने दंडाराम यांच्या घराचे दरवाजे तोडून त्यांना अटक करून त्यांचा छळ केला आणि अपमान केला. हे अजिबात समर्थनीय नाही.
एसआयआर वादग्रस्तच
एसआयआर अंतर्गत, निवडणूक आयोग नागरिकांकडून त्यांच्या पूर्वजांपर्यंतची माहिती मागत आहेत. राहुल गांधींनी मोदींना त्यांचे शिक्षण प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितले, पण मोदी ते दाखवत नाहीत.
प्रमाणपत्र दाखवण्यात काय अडचण आहे? जेव्हा पंतप्रधान स्वतःच आपले शिक्षण प्रमाणपत्र दाखवू शकत नाहीत, तेव्हा गरीब आणि अशिक्षित लोक त्यांच्या पूर्वजांची माहिती कशी गोळा करणार, असे रेवंत रेड्डी म्हणाले.





