‘EVM’ हॅकींग प्रकरणी गुन्हा दाखल ! ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

EVM News – राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये व्हिडिओमधील व्यक्ती ईव्हीएम मशिन हॅक करून एका राजकीय पक्षाच्या बाजुने निवडणुकांचा निकाल फिरवू, असा दावा करताना दिसून येते. या प्रकाराची तातडीने दखल घेत मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे.
एका वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशामध्ये निवडणूक आयोगानेच दखल घेत स्पष्टीकरण दिले की, व्हिडिओमध्ये केलेले दावे हे निराधार, खोटे आणि अप्रमाणित आहेत.
या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ईव्हीएम ही टँपरफ्रूफ असून नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ईव्हीएमवर विश्वास दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्येही अशाच प्रकारचा दावा करण्यात आला होता.
व्हिडीओमध्ये केला हा दावा
सध्या एकीकडे ईव्हीएमवरून राजकारण तापले असताना एका वृत्तवाहिनीच्या युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये व्हिडिओमधील व्यक्ती ईव्हीएम मशिन हॅक करून एका राजकीय पक्षाच्या बाजुने निवडणुकांचा निकाल फिरवू, असा दावा करताना दिसून येते.
त्यामध्ये किती जागांवर निकाल फिरवला जाईल? त्यासाठी व्हीव्हीपॅट मशिनचे काही नंबर मला हवेत आहेत, असेही ती व्यक्ती सांगताना दिसून येते. या व्हिडिओमध्ये अमिरेका हॅकर सैजय शुजाने दावा केली की, तो अमेरिकेमधील संरक्षण विभागाच्या तांत्रिक बाबींचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो. त्यासाठी, त्याने 54 कोटी रुपयांची मागणी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.





