Nagar | गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर; १६ ठिकांनी छापे; २२ आरोपी ताब्यात

नगर, (प्रतिनिधी) – खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलना नंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यावर १६ ठिकांनी छापे टाकून २२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४३ हजार २७५ रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे.
किशन संजय कांबळे, (रा. सोळातोटी कारंजा), नितीन राजन्ना भिंगारे (रा. राज चेंबर मागे, मंगलगेट,नगर) यांच्या विरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र विलास पवार (रा. खातगांव टाकळी, ता. नगर) हा फरार असून त्याच्या विरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
त्याच्याकडून ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच वर्षा रमेश गुंजाळ, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), मयुर दिलीप कांबळे (वय 20), वेंकटेश रामचरण सोनकरीवार ( रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ऋषीकेश शदर राक्षे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी ( रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), बिराजदार धोंडीबा क-हाडे ( रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तर शेवगाव पोलीस ठाण्यात इम्रान अब्दुल रहिम शेख, युनूस चाँद शेख, उत्तम दौलत कोल्हे, संदीप भाऊसाहेब मोरे, सुरेश लक्ष्मण नजन, रामेश्वर भरतरी नजन, भारत बाबासाहेब चोपडे, गणेश विष्णु आंधळे, शौकत दिलदार शेख, ऋषीकेश उध्दव पातकळ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ज्ञानेश्वर आण्णा उरुणकर, रा. मिरी, ता. पाथर्डी), राजु जनार्दन सातपुते (रा. साकेगाव, ता. पाथर्डी), गणेश आबासाहेब कराळे (रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) यांच्या विरूद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून देशी विदेशी दारु, गावठी हातभट्टीची तयार दारु, रसायन व ऑनलाईन बिंगो जुगाराची साधने, मोबाईल व रोख रक्कम असा २ लाख ४३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.





