satara | शासकीय कामात अडथळा आणल्याचा पाच जणांवर गुन्हा
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – कृष्णानगर येथे यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील टेबलवरील कागदपत्रे विस्कटून आणि कर्मचारी श्रीमती वैशाली प्रवीण बचुटे यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
हा प्रकार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता घडला. याबाबत उपकार्यकारी अभियंता आनंद सावंत यांनी फिर्याद दिली असून, आशिष बाबुराव हुंबे (रा. शिरंबे, ता. कोरेगाव), संदीप रवींद्र कांबळे (रा. संगमनगर, सातारा),
समाधान निकम (रा. जांभ, ता. कोरेगाव), नेताजी राजाराम खराडे (रा. दरुज, ता. खटाव), नीलेश आनंदराव जायकर (रा. शिवथर, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. हवालदार पोतेकर, देशमुख तपास करत आहेत.





