Rinku Singh Engagement : रिंकू सिंग आणि प्रिया सरोजचा साखरपुडा संपन्न; अनेक सेलिब्रिटींनी लावली हजेरी, पाहा रिंग सेरेमनीचा VIDEO

Rinku Singh and Priya Saroj Engagement Ceremony : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या (सपा) खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाला आहे. ८ जून (रविवार) रोजी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा पार पडला. लखनौच्या पंचतारांकित हॉटेल सेंट्रममध्ये हा सोहळा संपन्न झाला. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार आणि पियुष चावला यांच्याव्यतिरिक्त, यूपी रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल यांच्यासारखे प्रसिद्ध खेळाडू देखील या समारंभाला उपस्थित होते.
१८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये होणार लग्न –
रिंकू-प्रियाच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. हे दोघे १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये लग्न करणार आहेत.रिंग सेरेमनीत रिंकू सिंग पांढऱ्या पोशाखात दिसला, तर प्रिया सरोजने गुलाबी रंगाचा पोशाख घातला होता. प्रिया सरोज स्टेजवर पोहोचताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नंतर दोघांनीही हसतमुखाने पोज दिली. समारंभाला सुमारे ३०० पाहुण्यांची उपस्थिती होती. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, प्राध्यापक रामगोपाल यादव, जया बच्चन, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा समावेश होता.
दोघांनीही एकमेकांसाठी ऑर्डर केल्या होत्या खास अंगठ्या –
You can see live pictures of engagement of MP Priya Saroj and #cricketer Rinku Singh here Many congratulations to Rinku Singh and Priya Saroj on starting a new life. #RinkuSingh #PriyaSaroj #rinkusingh #Lucknow https://t.co/48lwOk7T3J pic.twitter.com/KV8l72xbFI
— Indian Observer (@ag_Journalist) June 8, 2025
साखरपुड्यासाठी दोघांनीही एकमेकांसाठी खास अंगठ्या ऑर्डर केल्या होत्या. प्रियाने कोलकाता येथून डिझायनर अंगठी खरेदी केली होती, तर रिंकूने मुंबईहून खास अंगठी ऑर्डर केली होती. दोन्ही अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. जोडप्याच्या आवडीनुसार मेनू देखील खास तयार करण्यात आला होता. प्रियाने रसगुल्ला आणि काजू पनीर रोल सारख्या तिच्या आवडत्या बंगाली पदार्थांचा समावेश केला होता. रिंकूचा आवडता पदार्थ पनीर टिक्का आणि मटर मलाई देखील मेनूमध्ये समाविष्ट होता.
विशेष पासद्वारे फक्त ३०० पाहुण्यांना प्रवेश –
Someone, please check if Rajiv Shukla has a twin or a clone. Man’s omnipresent. #Rinkusingh #PriyaSaroj pic.twitter.com/ovgvsvSTjy
— Hemant Batra (@hemantbatra0) June 8, 2025
या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. बारकोड स्कॅनिंग सिस्टम बसवलेल्या विशेष पासद्वारे फक्त ३०० पाहुण्यांना प्रवेश देण्यात आला. हॉटेलच्या आत आणि बाहेर खाजगी सुरक्षा आणि पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही व्हीआयपींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एक विशेष सुरक्षा पथक देखील सतर्क ठेवण्यात आले होते. या खास कार्यक्रमासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि खासदार डिंपल यादव यांना खास आमंत्रित केले होते. याशिवाय समाजवादी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये राम गोपाल यादव आणि पुष्पेंद्र सरोज सारखी नावे आहेत.





