दुबई – भारताच्या महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हीने आयसीसीने नुकत्याच जाहिर केलेल्या महिलांच्या टी-20 क्रमवारीत कारकीर्दीत पहिल्यांदाच दुसरे स्थान मिळवले. (Cricket Superstar Smriti Mandhana is on the rise in the latest ICC Women’s Player Rankings) तिने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरी केली व क्रमवारीत तिन स्थांनी प्रगती केली.
इंग्लंडविरूद्धच्या तीन टी-20 सामन्यात तिने एकूण 111 धावा केल्या आहेत. यापूर्वी मानधना एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानी होती. आता तिने टी-20 क्रमवारीतही प्रगती केली आहे. एकदिवसीय क्रमवारीत यंदा तीने सातवे स्थान मिळवले आहे.
100% Cricket Superstar Smriti Mandhana is on the rise in the latest @MRFWorldwide ICC Women’s Player Rankings 📈
Details 👇
— ICC (@ICC) September 20, 2022
टी-20 क्रमवारीत भारताची नवोदित सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा टॉप-10 मध्ये दाखल झाली असून तिने 666 गुणांसह सहावे स्थान प्राप्त केले आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने चार स्थानांची प्रगती केली असून ती आता 662 गुणांसह 9 व्या स्थानावर आहे.
टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची दिप्ती शर्मा सहाव्या स्थानावर असून हरमनप्रीत कौर 14 व्या स्थानी आहेत. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह 10 व्या स्थानावर असून राधा यादव 14 व्या स्थानावर आहे.