Nagar | एचआयव्हीविषयी जनजागृती राबविणे काळाची गरज : सुचित्रा पवार

संगमनेर, (प्रतिनिधी): श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लबद्वारे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही विषयी जागरुकता वाढविणे या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य अधिकारी सुचित्रा पवार, दत्तात्रय म्हस्के व कार्यालयीन अधीक्षक सचिन वालझाडे उपस्थित होते.
सुचित्रा पवार यांनी विद्यार्थ्यांना मागर्दशन करताना एचआयव्ही कसा पसरतो, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय कोणते आहेत, याबद्दल विस्तृत माहिती देऊन महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासाठी मोफत तपासणी सेवा पुरविली जाणार असे सांगितले.
दत्तात्रय म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एचआयव्ही प्रतिबंधक उपाययोजना, सुरक्षित लैगिंक आरोग्य आणि रक्तदान यावर कार्यशाळा, शिबीरे आणि विविध उपक्रमामध्ये भाग घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास सोन्नर यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन कांदळकर याने केले. परिचय सुहास डोंगरे याने केला. आभार ऐश्वर्या चकोर हिने मानले.




