Nagar | शेवगावात भाकपची आज जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषद

नगर (प्रतिनिधी) – देशात जातनिहाय जनगणना करा, नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची ५० टक्के ची मर्यादा त्वरित उठवा या मागण्यांसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.१८) रोजी शेवगाव मार्केट कमिटी येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात परिषदेला प्रारंभ होणार आहे.
या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.ॲड. बन्सी सातपुते, सहसचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे व कॉ. संजय नांगरे यांनी केले आहे.
नगर जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे उद्घाटन राजकिय अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आनंद शितोळे यांच्या हस्ते होणार आहे.
भाकपचे राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कॉ.प्रा.डॉ. राम बाहेती, भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे, आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, अर्शद शेख उपस्थित राहणार आहेत.





