पुणे जिल्हा | डोण येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
Updated On:

मंचर, (प्रतिनिधी)- डोण (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत एक नर जातीचा गवा (वय 2 वर्षे) मंगळवारी पाय घसरून विहिरीत पडून मृत पावल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बुधवारी सकाळी पशुसंवर्धन अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा पंचनामा करून त्यांनी गव्याला विहिरीतून बाहेर काढले. गव्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर गव्याला जमिनीत दफन करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ युवराज रघतवान,
डॉ मिलिंद भोईर, डॉ मधुकर सुरकुले, वनविभागाचे वनपाल ए. एन. सोनवणे, वनरक्षक एन. एस. विरणक, एफ. के. काळे तसेच दत्तात्रय गवारी, ज्ञानेश्वर शेखरे, जावजी गवारी, शंकर केंगले आदी ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.





