मुंबईत पुन्हा कोविड लसींचा तुटवडा
Updated On:

मुंबई – केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणासाठीचा लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने बुधवारी मुंबईतील अनेक मोफत लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
महापालिकेतर्फे या संबंधात जे निवेदन जारी करण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की लस उपलब्ध झाल्यानंतर संबंधीत केंद्रांवर लगेच तिचे वाटप सुरू केले जाईल. लसींच्या उपलब्धतेबाबत नागरीकांना वेळेत माहिती दिली जात आहे असेही महापालिकेने म्हटले आहे.
लसींअभावी लसीकरण बंद करण्याचा प्रकार गेल्याच महिन्यात मुंबईत घडला होता. या महिन्यातही तसाच अनुभव आला आहे.
मुंबईत आत्तापर्यंत 73 लाख 36 हजार 171 नागरीकांना लसींचे डोस देण्यात आले आहे. त्यात मोफत आणि विकत लस घेणाऱ्या दोन्ही प्रकारच्या नागरीकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 18 लाख 9 हजार 75 जणांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.





