Khan Sir Case : खान सरांच्या अटकेला न्यायालयाची स्थगिती; दिले महत्वाचे आदेश…
प्रसिद्ध शिक्षक फैसल खान उर्फ 'खान सर' (Khan Sir ) यांना कोचिंग इन्स्टिट्यूटमधील गोळीबार प्रकरणात पाटणा न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Khan Sir Case – प्रसिद्ध शिक्षक फैसल खान उर्फ ‘खान सर’ यांना कोचिंग इन्स्टिट्यूटमधील गोळीबार प्रकरणात पाटणा न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने त्यांच्या अटकेपासूनच्या संरक्षणाला आगामी ३ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तोपर्यंत त्यांच्यावर ‘कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे’ आदेश लागू राहतील.
जून महिन्याच्या सुरुवातीला काही समाजकंटकांनी खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटची तोडफोड केली होती. यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारानंतर नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये खान सरांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. (Khan Sir Case )
याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ९ जून रोजी अटकेपासून संरक्षण दिले होते, जे आधी ३० जूनपर्यंत आणि आता ३ जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे.

Khan Sir Case : खान सरांच्या अटकेला न्यायालयाची स्थगिती; दिले महत्वाचे आदेश…
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सध्या कोठडीत असलेल्या खान सरांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांच्या शस्त्र परवान्यांबाबतचा तपशील मागवला आहे.
न्यायालय ३ जुलै रोजी या सुरक्षारक्षकांच्या जामीन अर्जांवरही सुनावणी करणार आहे. या प्रकरणातील तोडफोडीचे आरोपी रोशन आनंद सध्या जामिनावर बाहेर आहेत.





