विष प्राशन करून दाम्पत्याने केली आत्महत्या; वसईतील घटना
Updated On:

पालघर – पालघर जिल्ह्यातील वसई येथील भोईपाड्यात राहणाऱ्या एका तरूण दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
विष्णु पटेल (वय 26) आणि प्रतिभा (वय 22) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. विष्णु हा मशिन ऑपरेटर होता व तो एका प्लॅस्टिक कंपनीत कामाला होता. या दाम्पत्याला एक वर्षाचा लहान मुलगा आहे.
मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजारच्या लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. त्यांनी आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली किंवा कसे हे अजून समजू शकलेले नाही. त्यांनी कोणतीही चिठठी लिहून ठेवलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.





