भरसमुद्रातील रोमान्स आला अंगलट,बॉयफ्रेंडच्या डोळ्यादेखत गर्लफ्रेंड गेली वाहून; Video आला समोर

नवी दिल्ली : आपण अनेकवेळा समुद्र किनारी फिरायला जात असतो. यावेळी अनेकजण तो क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी हटके करत असतात. मात्र कधी कधी या गोष्टी आपल्या अंगलटसुद्धा येतात.अशीच एक घटना एका कपलच्या बाबतीत घडली. यामध्ये भरसमुद्रात रोमान्स करणे एका कपलच्या चांगलेच अंगलट आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
रशियातील सोची येथील ही धक्कादायक घटना आहे. एक जोडपं समुद्राच्या लाटांमध्ये रोमान्स करत होतं. थोडा वेळ सर्व काही सुरळीत होतं. पण काही वेळाने समुद्राची एक मोठी लाट येते आणि प्रियकरसमोरच प्रेयसीला घेऊन जाते. पाहता पाहता तरुणी समुद्रात गायब होते. तरुणाने तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण लाटांसमोर काहीच चाललं नाही. ही घटना रविवार 16 जून रोजी घडली. तीन दिवसांपासून मुलीचा शोध सुरू आहे.
पहा व्हिडिओ
https://twitter.com/CollinRugg/status/1803202866066375032





