धक्कादायक! आर्थिक तंगीमुळे पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
Updated On:

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात एक तीस वर्षीय इसम आणि त्याच्या पत्नीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आर्थिक तंगीतून त्यांनी हा प्रकार केल्याचे सकृत दर्शनी दिसून आले आहे. कोविड काळात या इसमाला त्याच्या व्यवसायात तोटा झाल्यानंतर त्यातून तो सावरूच शकला नाही. त्यामुळे हे दाम्पत्य तणावाखाली होते.
सचिन सुतार आणि त्याची 28 वर्षीय पत्नी शर्वरी असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी शनिवारी मध्यरात्री घरातच गळफास लाऊन घेतला. या दाम्पत्याला सहा आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत. सचिन सुतार याचा फर्निचरचा व्यवसाय होता व त्याची पत्नी घरकाम करीत होती. पोलिस अधिक तपास करीत आहेत.





