“बनावट क्लोजअप अन् इनो… ” ; दिल्लीत दोन कारखान्यांवर छापा, ‘विष’ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Counterfeit Products। दिल्लीतील एका बातमीवरून लोकांचे आरोग्य किती धोक्यात आले आहे याचा अंदाज येतो. छापेमारीदरम्यान दोन कारखाने उघडकीस आले, ज्याठिकाणी बनावट टूथपेस्ट, इनो आणि इतर दैनंदिन वस्तू तयार केल्या जात होत्या. छापा टाकणाऱ्या पथकाने आता दोन्ही कारखाने सील केले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, वझिराबादमध्ये असणारे हे कारखाने थोड्या अंतरावर आहेत. एका कंपनीने बनावट टूथपेस्ट बनवली, तर दुसऱ्या कंपनीने इनो बनवले. उत्पादनानंतर, उत्पादने दिल्ली आणि इतर राज्यांमधील बाजारपेठांमध्ये पुरवली जात होती.
एनो पिल्याने पोटात आग Counterfeit Products।
वझिराबाद पोलिसांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार, “याठिकाणी दोन कारखाने बनावट टूथपेस्ट आणि इनोसह इतर दैनंदिन वस्तू तयार करत होते. छापेमारीदरम्यान, मोठ्या प्रमाणात बनावट टूथपेस्ट आणि इनो जप्त करण्यात आले. जगतपूरमधील एका निवासी घरात मोठ्या प्रमाणात बनावट वस्तू देखील जप्त करण्यात आल्या.
याठिकाणी तयार होणाऱ्या टूथपेस्ट वापरल्यास दात किडण्यास कारणीभूत ठरू शकतो. बनावट इनो इतका शक्तिशाली होता की तो पिल्यानंतर अनेकांच्या पोटात जळजळ आणि आग होऊ शकते. दोन्ही कारखाने सील करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. Counterfeit Products।





