कफ सिरपमुळे चिंता वाढली! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, टोल फ्री क्रमांक जारी

Cough Syrup | मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात विषारी खोकल्याच्या सिरपमुळे अनेक बालमृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. याशिवाय राजस्थानमध्ये या कप सिरपच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत परिपत्रक जारी करत म्हटले की, कोल्ड्रिफ सिरप (फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप), बॅच क्रमांक SR-13, Mfg. Dt. मे-2025, Exp. Dt. एप्रिल-2027, स्रेसन फार्मा, सुंगुवरचाथिरम, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांनी उत्पादित केले आहे. यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) या विषारी पदार्थाची भेसळ केल्याचा आरोप आहे. Cough Syrup |
महाराष्ट्र FDA ने कोल्ड्रिफ सिरप बैच संख्या SR 13 की बिक्री, वितरण और उपयोग पर तत्काल प्रभाव से प्रतिबंध लगा दिया है। जिन लोगों के पास यह सिरप है, उन्हें इसकी सूचना औषधि नियंत्रण अधिकारियों को देने का निर्देश दिया गया है। pic.twitter.com/BiAIqG5CxR
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2025
हे लक्षात घेता, सर्व परवानाधारक आणि जनतेला कोल्ड्रिफ सिरप, बॅच क्रमांक SR-13 ची विक्री त्वरित थांबवण्याचे आणि विलंब न करता स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर उत्पादन बॅचचा साठा गोठवण्यासाठी तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी
राज्य सरकारकडून 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा jchq.fda-mah@@nic.in या ईमेलवर किंवा 9892832289 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्ड्रिप सिरप हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक वर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या औषधामधे डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातील विक्रेते वितरक आणि रुग्णालय यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो गोठवण्याच्या औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत. Cough Syrup |
हेही वाचा:





