Sanjay Raut : शिदेंच्या कार्यकाळात भष्ट्राचार; फडणवीसांचे दुसऱ्यांदा कौतुक, संजय राऊतांच ‘नाशिकम’धील विधान ठरतयं चर्चेच.. नेमक काय म्हणाले?

नाशिकः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भष्ट्राचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करु, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील तत्कालीन आरोग्य मंत्री (तानाजी सावंत) यांचे नाव न घेता त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. अशा भष्ट्र मंत्र्याना विरोध होता त्यातील ते एक आहेत, असा आरोप त्यांनी तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राऊतांनी भाष्य केले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
राऊत नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली ती काम झालीच नाही तो केवळ भ्रष्टाचारच. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होतं हे साऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो. मात्र त्या खात्यात भ्रष्टाचार होणार असेल तर ते कसलं खातं आणि कसलं राजकारण.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व थांबवत आहेत आणि पुढे ही थांबवणार असतील तर आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांच्या प्रत्येक कृतीचे आम्ही स्वागतच करू, असे संजय राऊता माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कोकाटे प्रकरणावर भाष्य
माणिकराव कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. सध्या मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नियम आणि कायदा पाहिला तर 24 तासात सुनील केदार यांची आमदारकी गेली. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही तेच झाले. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी संधी दिली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. असे असले तरी अद्यापही आमचा न्यायदेवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी कोकाटे प्रकरणावर दिली.





