करोनामुक्ताला पुन्हा होऊ शकतो संसर्ग
Updated On:

जिनिव्हा : एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होणार नाही अशा भ्रमात कोणी राहू नये, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
कोविड 19 पासून मुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये तयार झालेल्या अँटिबॉडीज त्याचे दुसऱ्यांदा लागण होण्यापासून रक्षण करतात, असा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाहीू, असे या संघटनेने आपल्या निवेरदनात म्हटले आहे.
काही देशातील सरकार करोनामुख्त झालेल्या नागरिकांना पुन्हा करोनाची बाधा होणार नाही असे गृहीत धरून त्यांना करोनाच्या संसर्गाकडे दूर्लक्ष करत कामामवर रुजू होण्यास मान्यता देत आहेत. त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. असा स्वरूपाच्या गृहितकांमुळे करोनाचा धोका वाढू शकतो, असे या संघटनेने म्हटले आहे.





