Coronavirus India : भारतात गेल्या 24 तासांत करोनाचे 6 हजार 984 नवीन रुग्ण, 247 मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 6 हजार 984 नवीन रुग्ण मिळाले आहेत. तर 247 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या दरम्यान 8 हजार 168 लोक करोनामुक्त देखील झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण 87 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत एकूण 3,41,46,931 लोक बरे झाले आहेत. तर एकूण मृतांची संख्या वाढून 4 लाख 76 हजार 135 झाली आहे.
दुसरीकडे, देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची प्रकरणे 61 वर पोहोचली आहेत. मंगळवारी दिल्लीत करोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे चार नवीन रुग्ण आढळून आले, तर महाराष्ट्रात या स्वरूपाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले. यासह, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या 61 वर पोहोचली आहे.





