CoronaUpdates : बीड जिल्हा कारागृहातील 28 कैदी पॉझिटिव्ह

बीड  – बीड जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहेत. सगळीकडेच करोनचा प्रसार होत असताना आता बीडच्या जिल्हा कारागृहातही करोनाने शिरकाव केला आहे. याठिकाणी 28 कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
बीड जिल्हा कारागृहामध्ये 161 कैद्यांची क्षमता आहे. पण या कारागृहात प्रत्यक्षात 297 कैदी आहेत.

क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट कैदी याठिकाणी असल्यामुळे कारागृहात कैद्यांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कैद्यांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहातील 28 कैद्यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता इतरही कैद्यांना याचा संसर्ग झाला असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.