Congress News : खळबळजनक ! कॉंग्रेसच्या आमदाराला 3 वर्षांचा तुरूंगवास; काय आहे नेमकं प्रकरण?
मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे (Congress News) आमदार राजेंद्र भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने फसवणुकीच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना ३ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Congress News : मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे (Congress News) आमदार राजेंद्र भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने फसवणुकीच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना ३ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. भारती यांनी याआधी भोपाळमधील जिल्हा सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे अध्यक्षपद भुषवले.
त्यावेळी त्यांनी बँकेच्या (Congress News) माजी कर्मचाऱ्याच्या मदतीने फसवणुकीच्या मार्गाने व्याजाच्या रूपाने आर्थिक लाभ लाटल्याचा आरोप आहे.
त्यावरून दिल्लीतील विशेष न्यायालयाने भारती आणि माजी कर्मचाऱ्याला प्रत्येकी ३ वर्षांचा तुरूंगवास ठोठावला. त्यांना प्रत्येकी १ लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
भारती यांच्या वतीने त्यांना राजकीय टार्गेट बनवले जात आहे. त्यांच्यावर (Congress News) राजकीय हेतूंनी आरोप करण्यात आला, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, तसे सिद्ध करण्यात भारती यांना अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले. आमदाराला २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीची शिक्षा झाल्यास विधानसभा सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास भारती यांची आमदारकी जाण्याची चिन्हे आहेत.






