corona vaccine : आज 197 केंद्रांवर लसीकरण मोहीम
Updated On:

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध असणार आहेत. कोविशील्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 250 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दिवाळीमुळे कोविशील्डची केंद्र शुक्रवारपर्यंत बंद करण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे.





