Corona Vaccine : दोन डोस घेतल्यानंतर सुरक्षेत तिप्पट वाढ

लंडन – करोना लस घेतलेल्या नागरिकांना दिलासा देणारा एक दावा करण्यात आला आहे. करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तीन पट अधिक सुरक्षा मिळत असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले.
करोना विषाणूवर ब्रिटनमधील सर्वात मोठ्या संशोधनापैकी एक असलेल्या ‘रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन’ चा बुधवारी अहवाल प्रकाशित झाला. या अहवालानुसार, 20 मे ते सात जून दरम्यान इंग्लंडमध्ये करोना संसर्गाचा दर चारपटीने अधिक वाढला असून जुलैनंतर संसर्ग दरात घट नोंदवण्यात आली.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या या काळात वाढल्याने प्रमाण घटते राहीले आहे. यापूर्वीही अनेक विविध संस्थांनी लसीच्या उपयुक्तततेचा दावा केला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर करोना होतच नाही असे नाही. मात्र तरीही ज्यांना लागण झाली आहे, त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागण्याचे अथवा मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे लस घेणे आणि सोशल डिस्टन्स राखणे हेच प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





