पुणे – देशात मुलांनाही लस दिली जाण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 18 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना लागू करण्यासाठी लस चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतु या दरम्यान, आयसीएमआरची लसीकरण संशोधन टीम आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स टीमच्या काही वेगळ्या शिफारसी आहेत.
या संघाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा म्हणतात की, मुलांना करोनावरील लस या वर्षी दिली जाणार नाही. पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान मुलांना लस देण्याचा पूर्ण प्रस्ताव आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे.
की मुलांना त्यांच्या पालकांइतका करोनाचा धोका नाही. वर्ष 2022 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान 2 ते 12 आणि 13 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल. जोपर्यंत मुलांना पूर्णपणे लसीकरण केले.
जात नाही तोपर्यंत शाळा उघडल्या जाणार नाहीत, अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जर
शाळेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण केले गेले असेल तर मुलांसाठी शाळा उघडण्यास कोणतीही अडचण येऊ नये. परंतु हा सर्व निर्णय संबंधित राज्यांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी
स्पष्ट केले.