भाजपशासित गोव्यातही लसीचा तुटवडा; उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांचे होणारे लसीकरण लांबणीवर
Updated On:

पणजी, दि. 29 – भाजपशासित गोव्यातही लसीचा अभाव दिसून आला असून, त्यामुळे 1 मेपासून तेथे सुरू होणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे काम सुरू होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्याला जेव्हा लस उपलब्ध होईल, त्यावेळी हे लसीकरणाचे काम सुरू होईल. ते म्हणाले की, आम्ही सीरम संस्थेकडे पाच लाख डोसची ऑर्डर नोंदवली आहे. त्यामुळे ही लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा हे लसीकरणाचे काम सुरू होईल.
केंद्र सरकारने आता राज्यांना थेट लस खरेदी करण्याची मुभा दिली असून, त्यामुळे आता राज्यांना त्यांच्याकडील लसीच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरणाचे काम सुरू करणे व त्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. टप्प्याटप्प्यानेच हे काम यशस्वी करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.





