Corona Vaccine : कोव्हिशील्ड लसीसंदर्भात ‘आसीएमआर’चं महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले…

नवी दिल्ली – देशात करोना संसर्ग थैमान घालत आहे. आरोग्य सुविधांअभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे देशात करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्याची मोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे. देशात संध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लसी देण्यात येत आहे. भारतातील या दोन लसीसंदर्भात आसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
सध्या अनेक राज्यांमध्ये लसींचे डोस कमी पडत असल्याने कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे. यावर आता भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थाचे (ICMR) डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर यासाठी वाढवण्यात आले कारण पहिल्या डोसमुळेमध्येच व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे.
कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १८ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे, कारण पहिलाच डोस व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करत आहे. परंतु कोवॅक्सीन लसींच्या दोन डोसमधील अंतर अद्याप वाढवण्यात आले नाही. यावर बोलताना डॉ. भार्गव म्हणाले की, कोवॅक्सीनच्या पहिल्या डोसनंतर रोग प्रतिकारशक्ती कोविशिएल्डपेक्षा वेगवान विकसित होत नाही. त्यामुळे कोवॅक्सिनच्या दोन डोसदरम्यानचे अंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंतच ठेवले आहे.
दरम्यान कोवॅक्सिनचा दुसरा डोस ४ आवठवड्यानंतर घेतल्यावरच या लसीचा परिणाम सुनिश्चित करण्यात येत आहे. तर कोव्हिशील्डचा पहिलाच डोस कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी ठरत असून पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, असंही डॉ. भार्गव यांनी म्हटलं आहे.





