Corona Vaccine : लसीकरण पूर्ण होऊनही 39 वैद्यकीय विद्यार्थी बाधित
Updated On:

थिरूवनंतपूरम – केरळमध्ये एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात प्रॅक्टिस करणारे 39 विद्यार्थी करोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे, त्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.
केरळमधील लॉकडाऊनमुळे त्रिस्सूरस्थित वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय काही काळासाठी बंद ठेवण्यात आले. ते 1 जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत एका विद्यार्थ्याला करोनाबाधा झाल्याचे आढळले.
त्यानंतर आणखी काहींना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये करोनाबाधित विद्यार्थ्यांचा खरा आकडा समोर आला.
सर्व बाधित विद्यार्थ्यांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. देशातील सर्व राज्यांचा विचार करता दैनंदिन बाधित संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे.





