#corona vaccination : ग्रामीण भागात “महा लसीकरण मोहीम’
Updated On:

पुणे -पुणे जिल्हा परिषदेकडून बजाज ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीणमध्ये “महा लसीकरण मोहिमे’चे आयोजन केले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी 13 तालुक्यांत ते होणार आहे. ग्रामीणमधील दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविड-19 लस उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
त्यामध्ये कोविशिल्ड लसीच्या दीड लाख डोसचे वाटप केले. ही लसीकरण मोहीम आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा
तालुक्यांत आयोजित करण्यात येणार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे बजाज ग्रुपचे सीएसआर हेड पंकज बल्लभ यांनी सांगितले.





