सातारा जिल्ह्यात दिवसभरात १५ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण १८१ करोनाग्रस्त

सातारा(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा ११ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती रात्री ११ वाजता देण्यात आली. त्यापूर्वी आठ वाजता चार रुग्णांचा अहवाल पाँझिटिव्ह आला.होति. म्हणजे बुधवारी दिवसभरात १५ पाँझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या १८१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे म्रुत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे.
बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील (चिंचनेर लिंब ता. सातारा येथील मुंबई वरून आलेला ३० वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील ३० व ३२ वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील ९ वर्षाची मुलगी) , वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ३ ( म्हासोली ता. कराड येथील २२ वर्षीय युवती व २८ वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील ३३ वर्षीय पुरुष), फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील २ (कोळकी येथील ७४ वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील ५० वर्षीय पुरुष, वाई ग्रामीण रुग्णालयातील कवठे ता. खंडाळा येथील ३३ वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल म्हासोली ता. कराड येथील ५० वर्षीय एक व्यक्ती अशा एकूण ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यापैकी फलटण येथील ७४ वर्षीय पुरुष १८ मे रोजी मुंबईवरून प्रवास करून आल्यानंतर मृत्यू झाला होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित व्यक्तिंची संख्या- १८१ झाली अआहे. यापैकी ७९ जण उपचार घेत आहेत. ९८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.





