Corona Update : राज्यात आज 4004 रुग्णांची नोंद
Updated On:

मुंबई – राज्यामध्ये जून महिन्याच्या सुरूवातीपासून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात रविवारी पुन्हा 4004 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णहे मुंबईतील असल्याने मुंबईकरांसमोरील चिंता वाढली आहे.
राज्यात आज एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,64,117 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात आज एकूण 23,746 सक्रिय रुग्ण संख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे.




