नीती आयोगाचा देशाला तिसऱ्या लाटेचा इशारा; दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरणार?

corona third wave news – देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत नाही तोवर संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. यात बहुतांश जिल्हांत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अशा परिस्थिती देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असा इशारा नीती आयोगानं व्यक्त केला आहे.
नीती आयोगाने केंद्र सरकाराला तसा इशाराही दिला आहे. साधारण पुढच्या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशाराही नीती आयोगाने दिली आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही अधिक धोकादायक ठरेल अशी भीती नीती आयोगाने व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ( corona third wave news )
यासाठी पुढच्याच महिन्यात दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकणार असून ते तय़ार ठेवण्याच्या सुचना नीती आयोगानं केल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने रविवारी केंद्रीय आरोग्य यंत्रणेला काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत.
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका जाणवतोय. यात गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते, तर तिसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ४ ते ५ लाख जणांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. ( corona third wave news )
प्रत्येकी १०० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यासाठी पुढील महिन्यात २ लाख आयसीयू बेडची गरज भासू शकते. त्यामुळे व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू बेड तयार ठेवावेत असा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जाते. डेल्टा व्हेरियंटचे जगभरात आत्तापर्यंत १३ म्युटेशन झाले आहेत. यातील पाच प्रकार भारतात आढळतात. यात कोरोना विषाणूवर अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये ७२ हजार ९३१ नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले.
त्यापैकी ३० हजार २३० मध्ये कोरोनाचे गंभीर प्रकार आढळले. तर २० हजार ३२४ नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकार सापडला आहेत त्य़ामुळे तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. ( corona third wave news )





