मुरूम येथील एका व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह
Updated On:

वाघळवाडी – बारामती तालुक्यातील मुरूम या गावातील एका व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमेश्वरनगर परिसरात पहिलाच करोना रुग्ण सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरील व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने तो स्वतः होऊन गुरुवारी (दि. २) पुणे येथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आज सकाळी त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाआहे. गेल्या चार महिन्यापासून सोमेश्वरनगर पारिसरातील नागरिकांनी काळजी घेतल्यामुळे या भागात एक ही करोना रुग्ण नव्हता, मात्र हा पाहिलाच रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.





