प्रभात वृत्तसेवा
पुणे – करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असतानाही काही बेजबाबदार व्यक्ती विनामास्क घराबाहेर फिरत असल्यामुळे संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या तब्बल 5 लाख 92 हजार 196 व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून 44 कोटी 12 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुणे शहरात 27 कोटी 58 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र, त्या काळातही काही नागरिक विनामास्क फिरताना आढळले. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर मनपा, नगरपालिका, पोलीस आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा बेशिस्तांवर कारवाई अजूनही केली जात आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात 1 लाख विनामास्क फीरणाऱ्यावर कारवाई करून तब्बल 5 कोटींचा दंड वसूल केला आहे.
क्षेत्र – बेशिस्तांची संख्या – आकारलेला दंड (रुपयांत)
पुणे मनपा – 5 लाख 62 हजार – 27 कोटी 58 लाख
पिंपरी-चिंचवड – 1 लाख 2 हजार – 5 कोटी 83 लाख 82 हजार
ग्रामीण भाग – 2 लाख 95 हजार – 10 कोटी 69 लाख 27 हजार