#corona positive : करोना योद्धा ठरलेला ‘सोनू सूद’च सापडला करोनाच्या विळख्यात

मुंबई – बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा पहिल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांसाठी देवदूत ठरला होता. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आणि करोनाचा हाच उद्रेक रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात करोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. करोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असून, बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार करोनाच्या विळख्यात सापडेल आहेत.
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
मध्यंतरी अभिनेता रणबीर कपूर आणि आमिर खानला करोनाची लागण झाली होती. त्यातच आता बॉलिवूडचा रिअल हिरो “सोनू सूद’ला सुद्धा करोनाची लागण झाली आहे. स्वतः सोनू सूद याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.





