Corona : करोनाविरोधातील लढ्याचं नेतृत्व बदलण्याच्या मागणीवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…ByPiyusha AwcharUpdated On:May 7, 2021, 07:42 pmवर्धा – देशातील करोनाविरोधी लढ्याचे नेतृत्व पंतप्रधान कार्यालयाऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवले जावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे गडकरींना फायदा होण्याऐवजी अडचणीच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असताना गडकरी यांनी या विषयाला फार महत्त्व न देता आपला खुलासा केला आहे. करोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व करण्याविषयीच्या मागणीवर थेट भाष्य करणे त्यांनी टाळले. मात्र, ते म्हणाले की, मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं. आम्हीही हाच प्रयत्न करत आहोत, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. टॅग्स:#Change Of Leadership#Corona#Nitin Gadkari#Of The Fight Against Corona ...
Nitin Gadkari E20 Challenge: "E20 मुळे एका जरी वाहनाचे नुकसान झाले, तर त्याचे नाव सांगा," ; इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला गडकरींचे खुले आव्हान
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्याकडून अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक; प्रेरणादायी म्हणत दिला गौरवपूर्ण संदेश