कोरोनामुळे ‘लाल परी’ला प्रवाशांनी म्हटलं ‘नो’
Updated On:

मुंबई- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने शाळा, काॅलेजला सुट्टया जाहीर केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता पकडला. मात्र याच सगळ्या प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासाच्या सुविधांना नकार दिला आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण टाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी खासजी वाहनाला प्राधान्य दिलं आहे. मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या गाड्यांमध्ये निम्याहून कमी प्रवासी प्रवास करताना दिसत आहे.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सगळे सज्ज झाले आहे. सगळीकडे लोक मास्क लावून फिरताना दिसून येत आहे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीला चांगलाच फटका बसत आहे.





