Coronavirus : देशात गेल्या 24 तासात करोनाचे 3 हजार 303 नवीन रुग्ण
Updated On:

नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 3 हजार 303 नवीन रुग्ण आढळले आहे. नवीन रुग्णांबरोबर देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 16 हजार 980 झाली आहे.
दैनंदीन पॉझिटिव्ही रेटमध्ये देखील 0.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 2 हजार 563 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. एकूण आकडेवारीवर नजर टाकली असता तर करोना बाधितांची संख्या 4 कोटी 25 लाख 28 हजार 126 झाली आहे. याशिवाय 5 लाख 23 हजार 693 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत करोनामुळे 39 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे




