Corona Alert : महाराष्ट्राची वाढली चिंता, कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे नवे तीन रुग्ण
Updated On:

Corona Alert : जिल्ह्यात तिघांना करोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला करोनाची लागण झाली होती.
१२ मे रोजी त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही करोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही करोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.





