शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरून वादंग; अन् ठाकरे गटाच्या खासदारचीही सोहळ्याला हजेरी

Eknath Shinde And Sharad Pawar | उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला जायला नव्हते पाहिजे’, असे सांगत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शरद पवार गटातील काही नेत्यांनी देखील यावर प्रत्युत्तर दिले होते. एकीकडे महाविकास आघाडीत या मुद्यावरून वाद सुरू असतानाच आणखी माहिती समोर आली आहे.
संजय दिना पाटील सोहळ्याला उपस्थित
दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावेळी ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण असल्यामुळे तिकडे गेलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील हे कार्यक्रमात हजर होते. विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही संजय दिना पाटील गेले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरविंद सावंतसह सर्व खासदारांनी एक पत्रकार परिषद बोलवली होती. त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील उपस्थित नव्हते. मात्र या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्मविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.… pic.twitter.com/NLDhDiOdmq
— Sanjay Dina Patil (@SDPatil_16) February 11, 2025
संजय दिना पाटील यांची पोस्ट
या कार्यक्रमाचे फोटो संजय दिना पाटील सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्मविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. Eknath Shinde And Sharad Pawar |
हेही वाचा:
हिना खान बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत करतेय लग्न? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा




